२५ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्तीनंतर मूळ मालकाला केला परत

Akola Marathi News 25 lakh stolen goods returned to the original owner after confiscation
Akola Marathi News 25 lakh stolen goods returned to the original owner after confiscation

अकोला : चोरी, हरवल्याच्या फिर्यादीतील मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला. हा मुद्देमाल मूळ मालकाला हस्तांतरीत करण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून विशेष अभियान राबविले जात आहे.

त्यानुसार ४ जानेवारी रोजी १८ वाहने आणि ५९ मोबाईलसह २५ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सोपविण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात चोरी गेलेल्या वस्तून परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व पोलिसांबाबत आभाराची प्रतिक्रिया उमटली होती.


पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे संकल्पनेतून अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करणेबाबत विशेष मोहिमेचे आयोजन केले जात आहे. जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने ता. ४ जानेवारी रोजी सर्व पोलिस स्टेशन स्तरावर गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. त्यात एकूण १८ वाहने (किंमत ६ लाख ६ हजार), ५९ मोबाईल फोन (किंमत ६ लाख ९० हजार ६३०) व सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून १२ लाख ४ चार २६४ रुपयांचा माल व इतर ६८ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण २५ लाख ६९ हजार ७५४ रुपयांचा मुद्येमाल मूळ मालकांकडे सोपविण्यात आला.

ही विशेष मोहीम पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी गणेश धुंपटवाड व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल मोहरर यांनी अथक परिश्रम घेवून पार पाडली यशस्वी केली.

यापूर्वी दीड कोटीचा माल परत
अकोला जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून यापूर्वीसुध्दा एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमालातील १ कोटी ४० लाख ८७ हजार ७३७ रुपयाचा मुद्येमाल फिर्यादीस परत करण्यात आला आहे. या मोहिमेला जुलैपासून सुरुवात झाली होती. डिसेंबर २०२० पर्यंत करून एकूण १ कोटी ६६ लाख ५९ लाख ४९१ रुपयांचा मुद्येमाल फिर्यादीस परत करण्यात आला आहे.

मुद्देमाल संख्या किंमत
वाहने १८ ६ लाख ६ हजार
मोबाईल ५९ ६ लाख ९० हजार ६३०
दागिने, रोख ८ १२ लाख ४ हजार २६४
इतर ६ ६८ हजार ८६०
एकूण ९० २५ लाख ६९ हजार ७५४

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com