esakal | आता या सुधारित भाडेदरावर धावतील रुग्णवाहिका
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Ambulances will now run on this improved fare

उच्च न्यायालयाने रुग्णवाहिकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरिता सामान्य नागरिकांच्या दृष्टीने तसेच रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे व हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर जाहीर केले आहेत.

आता या सुधारित भाडेदरावर धावतील रुग्णवाहिका

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला  ः उच्च न्यायालयाने रुग्णवाहिकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरिता सामान्य नागरिकांच्या दृष्टीने तसेच रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे व हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर जाहीर केले आहेत.


मारुती व्हॅनचे महानगरपालिका क्षेत्राचे रुग्णवाहिकांचे भाडेदर पाचशे रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार व जिल्ह्याबाहेर प्रती कि.मी. ११ रुपयांप्रमाणे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

टाटा सुमो व मॅटडोरचे महानगरपालिका क्षेत्राचे रुग्णवाहिकांचे भाडेदर ६०० रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत),

महानगरपालिका क्षेत्र सोडून १४०० रुपये व जिल्ह्याबाहेर प्रति कि.मी. १२ रुपये प्रमाणे. टाटा ४०७ व स्वराज मझदाचे महानगरपालिका क्षेत्राचे रुग्णवाहिकांचे भाडेदर ७०० रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत),

महानगरपालिका क्षेत्र सोडून १३०० रुपये व जिल्हाबाहेर प्रति कि.मी. १४ रुपये प्रमाणे तर आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहनात वातनुकूलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरात १५ टक्के वाढीव दराने राहील.

तसेच रुग्णवाहिकेतून जर कोविड रुग्ण वाहून न्यावयाचा असल्यास या दराव्यतिरिक्त पीपीई किट व वाहन निर्जंतुकीकरणासाठी एकूण ८०० रुपये अतिरिक्त यावे लागतील.

जिल्ह्यांतील नागरिकांनी सुधारीत भाडेदर व्यतिरिक्त रुग्णवाहिका चालक व मालक यांनी अतिरिक्त भाडेदरची आकारणी केल्यास त्याबाबतची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे करण्यात यावी.

जेणेकरून संबंधित रुग्णवाहिका चालक व मालकावर नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)