बेलगाव ग्रामपंचायत निवडणूकीचा सोशल मीडियावर जोरात प्रचार

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 7 January 2021

  मेहकर तालुक्यातील बेलगाव मोठी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लोकसभा विधानसभे प्रमाणेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. या सर्वांचे कारण म्हणजे सोशल मीडियाचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाढता वापर होय.

बेलगाव (जि.बुलडाणा) :   मेहकर तालुक्यातील बेलगाव मोठी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लोकसभा विधानसभे प्रमाणेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. या सर्वांचे कारण म्हणजे सोशल मीडियाचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाढता वापर होय.

ग्रामीण भागातही हातो हाती मोबाईल झाले आहेत. त्यामुळे आपले म्हणणे मांडण्यासाठी हा एक मोठा पर्याय लोकांच्या हाती आला आहे.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

 त्यामुळे अर्ज भरण्यापासून ते मी कसा चांगला आहे. मी किती कामे करतो. मला आपली मते द्या. अशा पोस्ट सोशल मीडियावर सर्रास दिसत आहेत, मात्र सर्वाधिक व्हायरल होत आहेत त्या वादग्रस्त पोस्ट. नुकतेच एक मागील काळातील ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

या क्लिपमध्ये ठेकेदाराला बिलाची रक्कम घेण्याच्या बदल्यात कमिशनची मागणी केल्याचे संभाषण आहे. गावातील मंडळी लगेच ओळखत असले तरी आपण तो नवेच अशी भूमिका या क्लिप मधील संबंधित व्यक्ती घेत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन होत आहे. तसेच आता मोबाईलवर बोलणारयांचेही धाबे दणाणले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Belgaum Gram Panchayat election campaign on social media