Video : दार उघड देवा, आता दार उघड!, मंदिर उघडण्यासाठी भाजपचा घंटानाद

मनोज भिवगडे
Saturday, 29 August 2020

लॉकडाउनमुळे गेले पाच महिने सर्व मंदिरे बंद आहेत. एकीकडे जूनपासून अनलॉक सुरू करून दारूची दुकेनेही उघडण्यात आली. मात्र धार्मिक स्थळांवर प्रार्थना, पूजा-अर्चा करण्यास मनाई आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद असल्याने मंदिराच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारिची पाळी आली आहे.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २२ मार्चपासून बंद असलेली मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी (ता.२९) जिल्ह्यात भाजपच्या वतीने ३४७ मंदिरात घंटानाद करण्यात आला. त्यात अकोला शहरातील ४७ मंदिरांचा समावेश होता.

लॉकडाउनमुळे गेले पाच महिने सर्व मंदिरे बंद आहेत. एकीकडे जूनपासून अनलॉक सुरू करून दारूची दुकेनेही उघडण्यात आली. मात्र धार्मिक स्थळांवर प्रार्थना, पूजा-अर्चा करण्यास मनाई आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद असल्याने मंदिराच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारिची पाळी आली आहे.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?

त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्याची परवागनी दिली असतानाही राज्यात मंदिरे बंद आहेत. त्यामुळे राज्यभर मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय भाजपने घेतला होता.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शनिवारी ३४७ मंदिरांमध्ये भाजप कार्यकर्ते व हिंदुत्वादी संघटनांनी सकाळी घंटानाद करून शासनाने लक्ष वेधले. अकोला शहरात राणीसती धाम येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात घंटानाद करण्यात आला. याशिवाय राजराजेश्वर मंदिर, मोठे राम मंदिर, सालासार मंदिर आदी प्रमुख मंदिरातही घंटानाद करण्यात आला.

 

रेशन दुकानदारांचे कमिशन सरकारी तिजोरित!

पोलिसांनी बजावल्या नोटीस
भाजपने घंटानाद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळीच जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमधून संबंधित धार्मिक स्थळांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय ज्यांच्या नेतृत्वात भाजपचे घंटानाद आंदोलन होणार होते, त्यांना पोलिसांनी नोटीस बजावून मंदिराच्या आतामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली होती. मंदिर न उघडता बाहेरच आंदोलन करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

बँकेला अंधारात ठेवून विकल्या शेळ्या, कर्ज घेतल्यानंतर १९ लाखांने फसवणूक

‘वंचित’च्या आंदोलनाचा धसका
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर व प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत शासनाला इशारा देत ३१ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. हिंदूत्वादी संघटनांना मंदिरांचा मुद्दा ‘वंचित’कडून हायजॅक होण्याची भीती असल्याने त्यांनी दोन दिवस आधीच मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन करून मंदिरे उघडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola marathi news BJPs bell rang to open the temple