लस दारात, पॉझिटिव्ह घरात, कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह

Akola Marathi News- Both die due to corona; 29 new positives
Akola Marathi News- Both die due to corona; 29 new positives

अकोला : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लसीकरणाला सुरूवात झाली असतानाच शनिवारी (ता. १६) दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याव्यतिरीक्त २९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३२८ झाली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०९ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे शनिवारी (ता. १६) जिल्ह्यात ३९० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३६१ अहवाल निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त दोघांचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित रुग्णांपैकी एक रुग्ण आरोग्य नगर, खदान येथील ६० वर्षीय पुरुष होते. त्यांना १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरा बळी अकोट येथील ५२ वर्षीय पुरुषाचा गेला. त्यांना १३ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर दोन मृत्यूमुळे जिल्ह्यात आता कोरोना बळींची संख्या ३२८ झाली आहे. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २७ अशा एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे शनिवारी (ता. १६) सकाळी २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १२ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व पूर्वा काम्पलेक्स येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिंजर ता. बार्शीटाकळी, अकोट, डाबकी रोड, जुने शहर, तरोडा कसबा ता. बालापूर, आदर्श कॉलनी, बलवंत कॉलनी, शिवाजी नगर, जिल्हा परिषद कॉलनी, दीपक चौक, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, कौलखेड, रतनलाल प्लॉट, आनंद नगर, हिंगणा रोड, राजेश्वर मंदिर, नयागाव व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११११७
- मृत - ३२८
- डिस्चार्ज - १०१८०
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६०९

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com