
घरकुल लाभार्थींना हक्काच्या घरासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. आताकुठे घरकुल मंजूर झाले तर दुसरीकडे बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने लाभार्थ्यांना घरासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.
अकोला : घरकुल लाभार्थींना हक्काच्या घरासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. आताकुठे घरकुल मंजूर झाले तर दुसरीकडे बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने लाभार्थ्यांना घरासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.
घरकुल लाभार्थींना मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी त्वरीत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल लाभधारकांना दीर्घ प्रतीक्षेनंतर घरकुल मंजूर झाले. तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने बांधकासाठी त्यांना रेती मिळत नाही. तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २७०० लोकाचे घरकुल मंजूर झाले आहे. तालुक्यात विदृपा, गौतमा, आस, वान, पूर्णा या नद्या आहेत. यामधे मोठ्या प्रमाणात रेती घाट असून लिलाव न झाल्याने घरकुल बांधकाम बंद आहे.
हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
बांधकामाअभावी संसार उघड्यावर
तालुक्यातील बाराशे लाभधारकांना पहिला टप्पा मिळाला आहे. त्यांनी आपले घर पाडले. आता रेती उपलब्ध नसल्याने त्यांच्या घराचा संसार उघड्यावर पडला आहे. शासनाने घर दिले आहे, मात्र शासनाने घरकुल मंजूर केलेल्यांना रेती उपलब्ध करून दिली नाही.
जप्तीतील रेतीचा करावा सद्उपयोग
जिल्ह्यात कुठेच रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यानंतरही मोठ्याप्रमाणावर रेतीचा उपसा सुरू आहे. त्याविरुद्ध महसूल आणि पोलिस विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. या कारवाई जप्त रेती ही कार्यालयाच्या परिसरात पडून आहे. त्याचा सद्पयोग करून ती रेती घरकुल व शासकीय उपक्रमातील बांधकामांना देण्यात यावी, अशी मागणीही घरकुल लाभार्थ्यांकडून होत आहे.
हेही वाचा - हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान
मला घरकुलाचा पहिला टप्पा खात्यात मिळाला. मी जुने घर पाडून बसलो. रेती उपलब्ध नसल्याने मला उघड्यावर राहावे लागत आहे. बांधकामासाठी मी तेल्हारा तहसीलदार राजेश गुरव यांना तसे निवेदन दिले आहे.
- मनोहर खारोडे, घरकुल लाभार्थी, तळेगाव बाजार
हेही वाचा - तीस वर्षांपासून रक्तपुरवठा करीत तरुणाला दिले जीवदान!
रेती घाटांचा लिलाव अद्याप होणे बाकी आहे. शासनाकडून रेती घाट लिलाव झाल्यास घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करता येईल.
- राजेश गुरव, तहसीलदार, तेल्हारा
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर
तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू