संकेतस्थळ अपडेट नसल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाला दंड

Akola Marathi News District Womens Hospital fined for not updating website
Akola Marathi News District Womens Hospital fined for not updating website

अकोला : ई-रक्तकोष तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध रक्तसाठ्याची नियमित माहिती अद्ययावत न केल्याप्रकरणी जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे करण्यात आली. सर्व सामान्य नागरिकांना रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याविषयी अद्ययावत व सहज माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ई-रक्तकोष या संकेतस्थळावर रक्तसाठ्या- विषयी दररोज माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा -अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देखील रक्तसाठ्याविषयी व इतर माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत आवश्यक माहिती अद्ययावत झाली नाही.

हेही वाचा -अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com