नवीन वर्षातही कोरोनाचे भय कायम, ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली ४४० वर

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 4 January 2021

 कोरोनामुळे होणाऱ्या कोविड रोगाने ग्रस्त ४५ नव्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे ४४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड रोगाने ग्रस्त ४५ नव्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचे ४४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. ३) जिल्ह्यात ४४३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३९८ अहवाल निगेटिव्ह तर ४५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १८ महिला व २७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गौरक्षण रोड येथील सात, छोटी उमरी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गांधी चौक येथील चार, गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालयजवळ व अकोट येथील प्रत्येकी तीन, तर उर्वरित तहसिल ऑफीस, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, अलंकार मॉर्केट, खडकी, अलंदा ता. बार्शीटाकळी, जलगाव नाहाटे ता. अकोट, बेलूरा ता. अकोट, हरीहर पेठ, तऱ्हाला, नकाशी ता. बाळापूर, कॉग्रेस नगर, कोठारी वाटीका मलकापूर, न्यु तापडीया नगर, खुफीया अपार्टमेन्ट, आदर्श कॉलनी, राजपूतपुरा व बोरगाव मंजु येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

२२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रविवारी (ता. ३) चार, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून चार, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून चार, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सात अशा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०५८४
- मृत - ३२३
- डिस्चार्ज - ९८२१
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४४०

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Even in the new year, the fear of corona remains, 45 new positive patients, the number of active patients has reached 440