
पूर्व विदर्भात भंडारा येथील रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर सर्वत्र फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये व शाळा-महाविद्यालयाचे सुद्धा फायर ऑडिट होणे गरजेचे आहे.
अकोला : पूर्व विदर्भात भंडारा येथील रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर सर्वत्र फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये व शाळा-महाविद्यालयाचे सुद्धा फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारे यंत्रणाच मात्र असक्षम आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारी अधिकारी व अपुऱ्या मनुष्यबळावर सुरू आहे. या परिस्थितीत हा विभाग आगीच्या घटनांमध्ये जबाबदारीने काम करीत असला तरी या विभागाला अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. हेही वाचा - ‘मुख्यमंत्री साहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना भन्नाट पत्र महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागावर अकोला शहराच्या हद्दवाढीसह १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रासह अकोला एमआयडीसी व अकोला तालुक्यातील ग्रामीण भागाचा भार आहे. एमआयडीसीसाठी स्वतंत्र फायर स्टेशन असणे आवश्यक आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अद्याप अकोला एमआयडीसीचे स्वतंत्र फायर स्टेशन तयार झाले नाही. मनपाची एक अग्निशमन गाडीच एमआयडीसीसाठी वापरली जाते. हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’ उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर ही गाडी एमआयडीसीला देण्यात आली. मात्र त्याचे भाडेही अद्यापही मनपाला मिळाले नसल्याची माहिती आहे. उर्वरित सहा गाड्या कार्यकरत आहेत. त्यावर चालक व फायरमन हे कंत्राटी व मानसेवी म्हणून काम करतात. अग्निशमन विभागाचे नियमित अधिकारी रमेश ठाकरे निवृत्त झाल्यापासून या विभागाचा कारभारही प्रभारींच्या खांद्यावरच आहे. त्यांना फायर ऑडिटसाठी प्रमाणपत्र देण्याकरिता पाहणी करण्यापासून सर्वच तांत्रिक कामासाठी असक्षम कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहवे लागत आहे. परिणामी आजपर्यंत अकोला शहरातील १६० रुग्णालये, शाळा व इमरतींचेच फायर ऑडिट होऊ शकले आहे. हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा पाण्यासाठी दोन वर्षांपासू प्रतीक्षा हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार तपासणीसाठी मंजुरीची प्रतीक्षा (संपादन - विवेक मेतकर) |
|||