इंधन दरवाढीचा फटका सर्वाधिक शेतीव्यवसायाला

पी.डी.पाटील
Monday, 22 February 2021

 पूर्वी शेतीचे कामे बैलांद्वारे केल्या जात होते. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी आशा प्रकारचे सर्व कामे केल्या जात होते. यामध्ये कुठलाही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायचे, प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवीत असे, बैलांची जास्त संख्या असेल, तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल, तर तो शेतकरी नाही आशा प्रकारचे समीकर तयार झालेले होते,

रिसोड (वाशीम) :  सर्वत्र डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसाय देखील यातून सुटला नाही. पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल आहे, तर डिझेलचे आजचेदर नव्वदीच्या घरात आहेत. डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे, ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाला मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.

अधिक वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

   पूर्वी शेतीचे कामे बैलांद्वारे केल्या जात होते. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी आशा प्रकारचे सर्व कामे केल्या जात होते. यामध्ये कुठलाही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायचे, प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवीत असे, बैलांची जास्त संख्या असेल, तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल, तर तो शेतकरी नाही आशा प्रकारचे समीकर तयार झालेले होते,

पेट्रोल दर साठी इमेज परिणाम

परंतु बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले. शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला मागील दोन दशकापासून शेतीत आमुलाग्र बदल झाला. घंटो काम मिनिटो में होत आसल्याने शेती मशागतीला यांत्रिकरणाची जोड लागली आहे. एक पीक काढले की, अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटरी फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली.

अधिक वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

ट्रॅक्टर शेती साठी इमेज परिणाम

पर्यायाने शेतकऱ्यांचा वेळ वाचाला, अंग मेहनत वाचली, मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले. डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढले. पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. विक्रीपेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे शेती तोट्यात जात आहे. राज्यकर्ते, निर्यात धोरण, शासकीय यंत्रणा, पतपुरवठा धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यात डिझेलच्या वाढत्या किंमती शेतकऱ्यांना तोट्यात आणत आहे. ट्रॅक्टरची मशागत शेतकऱ्यांना आज परवडणारी नसली, तरी कालानुरूप बैलांची शेती करणे आज तरी माणसाला शक्य नाही.  यासाठी  शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचं आहे.

अधिक वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

ट्रॅक्टर शेती साठी इमेज परिणाम

आजचे मशागतीचे दर  प्रति एकर 
नांगरणी एक हजार ८०० रूपये, रोटाव्होटर दोन हजार रूपये, फवारणी एक हजार ६०० रूपये, वाफे तयार करणे एक हजार ६०० रूपये,  सरी पाडणे एक हाजर रूपये असा खर्च शेतकऱ्यांना लागतो.

अधिक वाचा - अकोल्यात शेतकरी पुत्रांचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’; हातात काटेरी गुलाब घेऊन केलं आंदोलन 

धावपळीच्या युगात शेतीचे कामे लवकर व्हावे, यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरची शेती करीत आहेत, परंतु डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे शेती मशागतीचे दर वाढले आहे. शेती आणि वाढता खर्चांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-प्रवीण बोंडे, शेतकरी, व्याड.

अधिक वाचा - ट्रकने दिली हुलकावणी, कारचे नियंत्र सुटले अन् मायलेकींचा मृत्यू

ट्रॅक्टर शेती साठी इमेज परिणाम

डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामांचे दर वाढवावे लागले,  खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने तोट्यात धंदा जाऊ लागला. कोणताही व्यवसाय तोट्यात करणे शक्य नाही म्हणून दर वाढले, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
-गोपाल रंजवे, ट्रॅक्टर व्यवसायिक.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Fuel price hike hits agriculture the most