ग्रामपंचायत निवडणूक; फोडाफोडीची पॅनल प्रमुखांना धास्ती

Akola Marathi News Gram Panchayat Election; Fodafodi threatens panel chiefs
Akola Marathi News Gram Panchayat Election; Fodafodi threatens panel chiefs

तेल्हारा (जि.अकोला) : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ता. १८ जानेवारी रोजी घोषित करण्यात आले. काही ग्रामपंचायतीमध्ये जमतेम बहुमत आहे. अशा ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण होण्याची धास्ती पॅनल प्रमुखांना आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतच्या राजकीय आखाड्यास प्रारंभ होणार आहे.

कोरोनाचा फटका सर्व क्षेत्रातील लोकांना बसला आहे. तसाच राजकीय क्षेत्रास ही बसला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदत वाढ देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने तेथील निवडणूका घोषित केल्या. सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले;

पण नंतर ते आरक्षण रद्द करण्यात आले व निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघाते याची माहिती नसल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच काही ग्रामपंचायतीमध्ये पॅनलला जेमतेम बहुमत मिळाले. त्यातील सदस्य फुटू नये यासाठी पॅनल प्रमुखांना शक्ती पणाला लावन्याची वेळ आली आहे. बहुमत असूनही सरपंच पदाचे आरक्षण निघालेला सदस्य फुटून दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊ नये यासाठी सर्वच सदस्य पॅनल प्रमुखाला सांभाळावे लागत आहेत.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

एक-एक सदस्य सांभाळताना कसरत
सरपंच पदासाठी एक-एक ग्रामपंचायत सदस्य महत्त्वाचा असतो. इच्छुकांना डावलण्याची शक्यता दिसल्यास ते पार्टी बदलण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पॅनल प्रमुख सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सांभाळण्याची कसरत करताना दिसत आहेत. काही पॅनल प्रमुख आपल्या सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी गेले आहेत; मात्र याचा खर्च जो सरपंच होईल त्यांनी करायचा असा अलिखित करार झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com