
निवडणुका आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो.
अकोला: निवडणुका आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच काही अफलातून प्रकार घडतात. असाच प्रकार सद्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतो आहे.
खरं म्हणजे हा किस्सा आहे, लोकसभा निवडणूकांच्या काळातील. याआधी झालेल्या मतदानानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर या महिलेची जोरदार चर्चा होत आहे. ही महिला निवडणूक अधिकारी असल्याचा दावाही करण्यात येतोय.
लोकसभा निवडणुकीदरम्यान ही महिला मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी म्हणून काम बघत होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
या महिलेच्या ड्रेसिंग सेन्स आणि सौंदर्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.
एवढंच काय तर या निवडणूक अधिकाऱ्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडले, असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान, ही महिला नेमकी कोण आहे, याबाबतची अधिकृत माहिती वर्षे झाली तरी अद्याप समोर आलेली नाही. पण या महिलेच्या नावाबाबत काही दावे समोर आले आहेत.
काहींच्या म्हणण्यानुसार या महिलेचं नाव रीना द्विवेदी आहे. तर काही लोक या महिलेचं नाव नलिनी सिंह असल्याचा दावा करत आहेत.
दरम्यान, या महिलेची नेमकी ओळख समोर येवो अथवा ना येवो. पण सध्यातरी या महिलेबाबतची चर्चा मात्र सोशल मीडियावर थांबताना दिसत नाही. ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत ही महिला आपल्या गावला यावं असंही अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहं.
(संपादन - विवेक मेतकर)