
आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही बातमी वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल..
हिवरखेड (जि.अकोला) : आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही बातमी वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.
हेही वाचा - भाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आपसातच भिडले!
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादुर या 21 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध मागील काही वर्षांपासून सुरू होते.
हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....
दोघांचा प्रेम विवाह करण्याची त्यांची तयारी होती. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा यास विरोध होता. परंतु सदर युवक अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता.
त्यामुळे सदर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. मुलगा मुलगी आणि दोघांचे पालक पोलीस स्टेशनला हजर झाले होते.
मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगी सज्ञान होईपर्यंत कायद्यानुसार विवाह करता येत नाही असे पोलिसांनी युवकाला समजावून सांगितले.
हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!
परंतु प्रेमात आंधळा झालेला युवक कुणाचीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने शेवटी टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष प्राशन केले.
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी तात्काळ सदर युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा - बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय
याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की सदर प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वी सुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते बचावले, अशी माहितीसुद्धा अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)