
शहरातील जनता भाजी बाजारातील भाजी व फळ विक्रेत्यांना आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच किरकोळ विक्री करता येणार आहे. येथील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
अकोला : शहरातील जनता भाजी बाजारातील भाजी व फळ विक्रेत्यांना आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच किरकोळ विक्री करता येणार आहे. येथील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. शहरातील टॉवर चौक लगतचा जनता भाजी बाजार हा शहरातील मध्यवर्ती भागात आहे. या भाजीबाजाराला लागून बस स्थानक तसेच बाजार समोरील शासकीय विश्रामगृह आहे. या ठिकाणी सतत वर्दळ असते. वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी होत असते. हेही वाचा - ‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’ त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या भाजी बाजारात होत असलेल्या घाणीमुळे आजूबाजूचे परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. भाजीपाला व फळांच्या विक्रीकरिता येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता भाजी बाजार येथे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्यामुळे येथील ठोक भाजी बाजार हा वाशीम बायपास व लोणी रोड येथे यापूर्वी माहे एप्रिल २०२० मध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे. स्थलांतरित ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. गेले नऊ महिन्यांपासून सदर स्थलांतरित ठिकाणी बाजार सुरळीत सुरू आहेय असे असताना काही ठराविक विक्रेते सदर स्थलांतरीत ठिकाणी रात्री व्यापार संपवून पुन्हा जनता भाजी बाजार येथे अनधिकृतपणे रात्री धाउक बाजार सुरू करतानाचे निर्दशनास आले आहे. हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच त्यामुळे सदर ठिकाणी वाहनांची व्यक्तींची मोठ्या प्रमाणात रात्री गर्दी होते. त्यात सामायिक अंतर राखले जात नाही. फळे व भाजी विक्रेते हे रात्रीच्या सुमारास भाजीपाला तसेच फळांची हर्रासी करून विक्री करतातानाचे निर्दशनास आले आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस सदर भाजी बाजारामध्ये नागरिकांची ये-जा सुरू असल्यामुळे अवैध व्यवसाय तसेच विघातक कृत्ये भांडण-तंटे होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी हा बाजार सकाळी ६ ते रात्री १० वाजतेपर्यंत किरकोळ भाजी व फळ विक्रेत्यांसाठीच सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला आयुक्तांनी दिलेला आदेश (संपादन - विवेक मेतकर) |
|||