राजकीय उदासीनता; अखेर पशुधन विकास मंडळाचे नागपूरला स्थलांतरण

Akola Marathi News Livestock Development Board Nagpur Migration
Akola Marathi News Livestock Development Board Nagpur Migration

अकोला :  येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय अखेर नागपूर येथील वळू संशोधन केंद्रात स्थलांतरीत करण्याचा आदेश ता. ५ फेब्रुवारी रोजी धडकला. जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासिनता असल्याने राज्य स्तरावरील कार्यालय अकोल्यातून बाहेर केले.

राज्यातील दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने आवश्यक पशुधन विकसित करण्याकरिता २००२ मध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य पशुधन विकास मंडळाचे कार्यालय स्थापन करण्यात आले. या मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय अकोला येथे असून, हे कार्यालय पुन्हा एकदा अकोल्यातून नागपूर येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यावेळी वरिष्ठ पातळीवरून अकोल्यातील हे कार्यालय नागपूरला स्थलांतरीत करण्याबाबत अतिशय गोपनियरित्या प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
राज्यात विदर्भ हा कायम दुर्लक्षित राहिलेला प्रदेश. विदर्भात नागपूर वगळा कुठेही विकासाच्या पाऊल खुना दिसत नाही. त्यातही अमरावती विभाग तर कायमच दुर्लक्षित राहिला आहे.

अमरावती विभागात अकोला येथे महाबीज व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या दोन मोठ्या संस्था वगळता महाराष्ट्र राज्य पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय असलेले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातून संपूर्ण राज्यभर वळू संगोपन आणि वळू माता संगोपणाने व कृत्रिम रेतनासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या पशुधनाचे विर्य संकलनाचे काम राज्यभरातील प्रयोगशाळा व प्रक्षेत्रावरून चालते.

सन २००२ मध्ये केंद्र शासनाने पशुधन विकासासाठी निधी देताना राज्य शासनाला थेट निधी न देता स्वायत्त संस्थेमार्फत निधी देण्याची अट टाकल्याने पशुधन विकास मंडळाचा जन्म झाला. पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांच्या कार्यालयात प्रथम मंडळाच्या मुख्यालयाची स्थापना २ एप्रिल २००२ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर अकोला व पर्यायाने पश्चिम विदर्भातील दुग्ध व्यवसायाला चालणा देण्याच्या उद्देशाने तत्कालीन मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी मंडळाचे मुख्यालय अकोला येथे स्थलांतरीत केले.

सुरुवातीला चार वर्ष भाड्याच्या इमारतीत असलेल्या मंडळाच्या या कार्यालयाच्या इमारतीसाठी प्रधान सचिवांच्या प्रयत्नाने १६ वर्षांनंतर म्हणजे सन २०१९-२० मध्ये जिल्हा नियोजन समितीतून सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, हा निधी अद्याप मंडळाला मिळाला नाही.

त्यामुळे आजही हे कार्यालय पशुसंवर्धन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रातील एका पडक्या इमातीतून चालते होते. नुकतेच पालकमंत्र्यांनी इमारातीचा निधी तत्काळ खर्च करण्याचे व इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. त्यानंतर आठवडाभरातच कार्यालय नागपूर येथे स्थळांतरणाचा आदेश धडकला आहे.

हेही वाचा - तरूणांचा शोध; आता रस्त्यावर धावणार पाण्यावर चालणारी मोटसरायकल

निर्णय रद्द करण्याची भाजपकडून मागणी
महाविकास आघाडी सरकारने अकोला जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला असून, आता अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्राचे पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय कार्यालय नागपूरला नेण्याचा निर्णय घेवून त्यात भर टाकली आहे. पश्चिम विदर्भावर अन्याय करणाराचा हा निर्णय निर्णय रद्द करण्याची आग्रहाची मागणी अकोला जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com