Fasttag Update : टोलनाक्यांवर रोख रकमेऐवजी ‘फास्टॅग’द्वारे टोलवसुली सुरू

विवेक मेतकर
Tuesday, 16 February 2021

नव्या नियमांनुसार आता तुम्ही नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर आता फास्ट टॅग गरजेचा झाला आहे.

अकोला: नव्या नियमांनुसार आता तुम्ही नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर आता फास्ट टॅग गरजेचा झाला आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यात टोल नाक्यांची संख्या जेमतेम असली तरी प्रवासादरम्यान वाहनधारकांना फास्टटॅगसाठी तयार रहावे लागत आहे. 

भारतातील सर्व महामार्गांवर सोमवारी रात्री बारापासून ‘फास्टॅग’द्वारे टोलवसुली सुरू करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व टोलनाक्यांवर सोमवारी दिवसभर या प्रणालीच्या अंमलबजावणीची रंगीत तालीम करण्यात आली होती.  दरम्यान टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांमध्ये ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आले होते; तसेच ही सुविधा नसलेल्या वाहनचालकांचे समुपदेशन करून त्यांना ‘फास्टॅग’ बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयानुसार, सर्व टोलनाक्यांवर रोख रकमेऐवजी ‘फास्टॅग’द्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आली. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मंत्रालयाने सोमवारपर्यंतची मुदत दिली होती. आता ती संपुष्टात आली असून, ‘फास्टॅग’शिवाय प्रवास करणाऱ्या चालकाला दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.

आता सर्व टोल नाक्यांवर सकाळपासूनच या प्रणालीच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू करण्यात आले. रोखीने टोल देणाऱ्यांसाठीच्या राखीव मार्गिकेसह सर्व मार्गिकांमध्ये ‘फास्टॅग’ बसविण्यात आले होते. वाहनांना अद्याप ‘फास्टॅग’ न लावलेल्या वाहनचालकांना थांबवून ‘फास्टॅग’ बसवून घेण्याची विनंती केली जात होती. 

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

त्यासाठी प्राधिकरणासह विविध बँका आणि डिजिटल वॉलेट कंपन्यांचे ‘फास्टॅग’ विक्री बूथही टोल नाका परिसरात लावण्यात आले होते. या वेळी ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनचालकांनी काही तक्रारी केल्या. ‘फास्टॅग’ असलेल्या वाहनचालकांनाही टोल देताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्यावर टोल कर्मचाऱ्यांकडून चालकांचे समुपदेशन करीत तक्रारींचे निवारण केले जात होते. आणेवाडी येथील टोलनाक्यावरील एक मार्गिका रोखीने टोल देणाऱ्यांसाठी राखीव असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

जाता-जाता देखील करता येणार ‘फास्टॅग रिचार्ज 
१५  डिसेंबरपासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर असणाऱ्या  टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियमाप्रमाणे आता प्रत्येक छोट्या- मोठ्या वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानंतर आता नॅशनल पेमेंट्स कॅर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने  ग्राहकांना फास्टॅगला रिचार्ज करण्यासाठी भीम यूपीआयचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गरजेनुसार हा रिचार्ज करणे आता शक्य होणार आहे.

या सुविधेमुळे आता वाहन चालक चालू गाडीमध्ये देखील आपल्या फास्टॅगचे रिचार्ज करू शकणार आहे. त्यामुळे आता टोलनाक्यावर लागणाऱ्या लांब रांगा आणि गर्दीपासून सुटका होणार आहे. नॅशनल इलेकट्रॉनिक टोल कलेक्शन योजनेत ग्राहकांना  फास्टॅगचा चांगला अनुभव प्रदान करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की, या सुविधेमुळे टोल देयकासाठी ते एक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध करुन देण्यास सक्षम असतील

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News nitingadkari Toll collection on toll plazas started through Fastag instead of cash