थायलंडवरून आणलेली बाबासाहेबांची अष्टधातूंची मूर्ती गेली चोरीला

भगवान वानखेडे
Thursday, 30 July 2020

 एका अल्पवयीन बालकासह एकाने एका घरात चोरी करत 5000 रुपये नगदी आणि चक्क अष्टधातूंची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरून नेली.

अकोला :  एका अल्पवयीन बालकासह एकाने एका घरात चोरी करत 5000 रुपये नगदी आणि चक्क अष्टधातूंची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरून नेली.

हा प्रकार 26 ते 29 जुलै दरम्यान जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगरात घडला. या प्रकरणी 29 तारखेला सकाळी तक्रार दाखल झाली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जुने शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे यामध्ये एक जण अल्पवयीन आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

गुन्हेगाराला जात पात धर्म नसतो असे नेहमी म्हटले जाते. याच वाक्याचा प्रत्यय जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगरात आला आहे. कारण रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या ज्योती दामोदर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या घरात 26 ते 29 तारखेचा दरम्यान चोरी झाली. चोरांनी रोख रक्कम तसेच सोबतच थायलंडवरून आणलेली अष्टधातूंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ही चोरून नेली होती फिर्यादीने आधी इतरत्र शोध घेतला मात्र चोरी गेलेला मुद्देमालासह बाबासाहेबांची मूर्ती कुठेच आढळून आली नाही.

No photo description available.

तेव्हा 29 जुलै रोजी फिर्यादीने जुने शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चोरांचा शोध सुरू केला पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी याप्रकरणी शोध घेण्याचे आदेश दिले वरिष्ठांचा आदेश आला देत.

हेडकॉन्स्टेबल सदाशिव सुरडकर अनिस पठाण शेख रशीद महेन्द्र बहादुरकर नितीन मगर रतन दंडी आणि धनराज ठाकूर यांनी आरोपींचा 24 तासात शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Image may contain: one or more people and indoor

तर आरोपीने चोरून नेलेल्या मुद्दे मला पैसे बाबासाहेबांची मूर्ती आणि रोख रक्कम रुपये 2000 जप्त केले आहे या प्रकरणात चोरी प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन बालक असून आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहेत.
(संपादन-विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News The octagonal idol of Babasaheb from Thailand was stolen