
स्थानिक पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस जमादार विलास ताजणे यांना ता.३१ डिसेंबर च्या रात्री दरम्यान कर्तव्यावर असताना जुन्या बस स्थानक परिसरात १६ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल तसेच, त्यासोबत एक पॉकेट, एटीएम कार्ड, आधार कार्ड, काही रक्कम असा येवल त्यांना सापडला.
मालेगाव (जि.वाशीम) : स्थानिक पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस जमादार विलास ताजणे यांना ता.३१ डिसेंबर च्या रात्री दरम्यान कर्तव्यावर असताना जुन्या बस स्थानक परिसरात १६ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल तसेच, त्यासोबत एक पॉकेट, एटीएम कार्ड, आधार कार्ड, काही रक्कम असा येवल त्यांना सापडला.
त्या पॉकेटमध्ये असलेल्या आधार कार्ड वरून ताजने यांनी खात्री पटवून सदर मोबाईल व पाकीट तालुक्यातील बोर्डी येथील गोपाल देवळे यास प्रामाणिकपणे परत केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बोर्डी येथील गोपाल देवळे हे ता.३१ डिसेंबर रोजी मालेगाव येथे आले असता, सायंकाळच्या दरम्यान हे परत आपल्या गावी बोर्डी जात असताना त्यांच्या जन्मदिनी घेतलेला १६ हजार रूपये किमतीचा महागडा मोबाईल, पॉकेट त्याच्यामध्ये आधार कार्ड, एटीएम कार्ड, रक्कम रक्कम अज्ञात ठिकाणी पडली होती. ता.३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सर्वत्र पोलिस बंदोबस्त लावला होता.
त्यावेळी जमादार ताजणे हे पोलिस स्टेशन समोर असलेल्या जुन्या बस स्थानक परिसरात कर्तव्यावर असताना, त्यांना नवीन मोबाईल व पाकीट खाली पडलेले दिसले त्यांनी सदर पाकीट मोबाईल घेऊन त्या पाकीट मधील आधार कार्ड च्या नावावरून व पत्त्यावरून बोर्डी येथील पोलिस पाटील देवळे यांच्याशी संपर्क साधून गोपाल देवळे या युवकांची पक्की खात्री पटल्यानंतर पोलीस पाटिल व अन्यांच्या समक्ष सदर मोबाईल व पाकीट परत दिले. सदर युवकाला नवीन वर्षाचा सुखद अनुभव येऊन, पोलिस जमादार ताजने यांचे आभार मानले. ताजने यांच्या प्रामाणिकपणाचे ठाणेदार आधारसिंग सोनोने व स्थानिक पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा कौतुक केले.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -
पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!
उद्ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती
तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची
शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!