आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेवर प्रहारने घेतला आक्षेप

विवेक मेतकर
Monday, 4 January 2021

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांशी बदलीप्रक्रियेसह शिक्षकांच्या अन्य प्रलंबित समस्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रश्न साेडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
 

अकोला:  जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांशी बदलीप्रक्रियेसह शिक्षकांच्या अन्य प्रलंबित समस्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रश्न साेडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

शासनाच्या ग्राम विकास विभागाने राबविलेल्या आंतर जिल्हा बदली टप्पा ४ मध्ये उर्दू माध्यमाचे शिक्षक बदलून आले आहेत. या सर्व १२ शिक्षकांना लवकरात लवकर हजर करून घ्यावे, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केली.

त्यासोबतच आंतरजिल्हा बदली टप्पा ४मध्ये बदली होऊन आलेल्या शिक्षक समुपदेशन प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेप नाेंदवला. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने अहवालसुद्धा मागविला असल्याने संबंधित अहवाल तातडीने सादर करण्यात यावा, अशीही मागणी संघटनेने केली.

प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष महेश ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मंगेश टिकार जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष अशोक गाडेकर , संपर्क प्रमुख हेमंतकुमार बोरोकार कार्याध्यक्ष अमर भागवत, काेषाध्यक्ष जवाद अहमद यांच्यासह शाह इरफान आदी उपस्थित हाेते.

(संपादन - विवेक मेतकर)

 

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Prahar took objection on the inter-district transfer process