वाहनाने कट मारला अन् गाडीवरचे नियंत्रण सुटले, पुढे काय झाले वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 7 January 2021

दर्यापूर रस्त्यावरील सिरसो फाट्याजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कावा मारल्याने मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्ड्यात पाडल्याने गंभीर जखमी झाला.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : दर्यापूर रस्त्यावरील सिरसो फाट्याजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कावा मारल्याने मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्ड्यात पाडल्याने गंभीर जखमी झाला.

मूर्तिजापूर - दर्यापूर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदी करण झाल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे व अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रामकृष्ण बागराज पवार (५०, रा. खैरी, आसेगाव पूर्णा) हे आपल्या मुलीच्या पत्रिका वाटून गावाकडे मोटारसायकल ( क्रमांक एमएच २७ बीसी ८६३४) ने गावी परत जात असताना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने कावा मारल्याने त्यांचे नियंत्रण सुटताच ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

त्यांना तातडीने उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News A serious in a motorcycle accident at Murtijapur