
माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते.
वाशीम : साहेब, मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, लग्नासाठी अशी मागणी थेट राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. वऱ्हाडातील वाशिमच्या गजानन राठोड या युवकाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलंय.
माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे” अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे.
काय आहे मागणी?
सध्या माझे वय 35 वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजे, असे गजाननने लिहिले आहे.
हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार
स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नशीब आजमावणारा वाशिम येथील विद्यार्थी म्हणतो, आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, अशी नम्र विनंती त्याने केली आहे.
याआधीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत. कधी चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून घातलेली साद डोळ्यात पाणी आणतात, तर काही जणांच्या अजब मागण्या हसता पुरेवाट करतात. तर काही मागण्या अचंबीत करून टाकतात.
आत्महत्येची परवानगी द्या अन्यथा नक्षलवादी बनून तुमच्यासमोर येईल
घरची परिस्थिती जेमतेम अन् त्यातही वैभवमध्ये शिकण्याची मोठी जिद्द. शिक्षणासाठी त्याने बॅंकेकडे शैक्षणिक कर्ज मागितले. पण, वडिलांनी बॅंकेचे पिक कर्ज फेडले नसल्यामुळे त्याला कर्ज नाकारले.
यासर्व प्रकरणातून हताश झालेल्या वैभवने चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली होती. परवानगी दिली नाही, तर नक्षलवादी बनून तुमच्यासमोर येईल, अशा गंभिर इशारा सुध्दा त्याने दिला.
सविस्तर वाचा - अन्यथा नक्षलवादी बनून तुमच्यासमोर येईल
(संपादन - विवेक मेतकर)