esakal | पाणीप्रश्न झालाय गंभीर, आता १५ दिवसांतून एकदाच होणार पाणीपुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Water problem become seriouswater supply will be provided only once in 15 days

जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असताना खारपाणपट्ट्यातील बारुला नावाने प्रसिद्ध असलेल्य बारा गावांसह बाळापूर तालुक्यातील २९ गावांचा पाणी प्रश्न गंभीर रुप घेत आहे.

पाणीप्रश्न झालाय गंभीर, आता १५ दिवसांतून एकदाच होणार पाणीपुरवठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला:  जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असताना खारपाणपट्ट्यातील बारुला नावाने प्रसिद्ध असलेल्य बारा गावांसह बाळापूर तालुक्यातील २९ गावांचा पाणी प्रश्न गंभीर रुप घेत आहे.

स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असतानाही या परिसरात पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, या गावांच्या बाजूने अकोट येथे तीन दिवसातून एकदा तर अकोल्यात चौथ्या-पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक


अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बारुला परिसरातील गावांसह बाळापूर तालुक्यातील २९ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी स्वतंत्र खांबोरा नळ योजना आहे. गोड्या पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे. असे असतानाही या भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. जमिनीतील पाणी पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

चार कोटीची योजना पाण्यात
बारुला विभागासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता वारी हनुमान येथील वान धरणातून जलवाहिनी टाकण्यासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या जलवाहिनीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही बारुल्यात एक दिवसहीया जलवाहिनीतून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी चार कोटी रुपयांची योजना पाण्यात गेली.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची मागणी
दररोज पाणी देणे शक्य नसले तरी आठवड्यातून एक दिवस तरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बारुल्यातील नागरिकांनी केली आहे. घुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनतून ही मागणी केली.

उपोषणाचा इशारा
बारुल्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत दहा दिवसात सातव्या दिवशी पाणी पुरवठयाचे नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाचा इशाराही विजयकुमार घावट यांनी दिला.

हे नक्की पहा- आजच्या ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा

जिल्हा परिषद सभेतही गाजला होता विषय
खारपाणपट्ट्यात पाणीपुरवठा करण्याचा विषय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसभेतही गाजला होता. पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचा विषय शिवसेना सदस्यांनी मांडला होता. यासंदर्भात नियोजन करून आठवड्यातून एकदिवस पाणी पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली होती.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image