esakal | दोन आठवडे थंडीची लाट; पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi Weather News Two weeks cold wave; Expert advice on precautionary measures

गेल्या आठवड्यापासून मोसमातील निच्चांक तापमानासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, शीतलहरीचा फळपिकांवर विपरित परिणाम पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. गजानन तुपकर यांनी दिला.

दोन आठवडे थंडीची लाट; पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : गेल्या आठवड्यापासून मोसमातील निच्चांक तापमानासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, शीतलहरीचा फळपिकांवर विपरित परिणाम पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. गजानन तुपकर यांनी दिला.

किमान तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी होत असल्याचा विपरित परिणाम संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पपई इत्यादी फळबागांमध्ये दिसून येतो. फळझाडांची कार्यशक्तीसुद्धा कमी होते.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

त्यापेक्षाही तापमान कमी झाले, तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती वाळल्यासारखी दिसतात, फळांना भेगा पडतात, फळे काळी पडतात. खोड तसेच फांद्यांचा मध्यभाग काळपट होतो. परंतु, बाहेरील साल सूस्थितीत असते. काही वेळा खोडाची जमिनीलगतची साल फाटते. अति थंडीमुळे पेशींतील पाणी गोठल्यामुळे पेशी फाटतात तसेच मुळांनासुद्धा तडे जातात. ही स्थिती लक्षात घेता फळझाडांची थंडीच्या कालावधीत योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

पूर्वदक्षतेचे उपाय
फळबाग लागवडीच्या वेळीच पश्‍चिम व दक्षिण दिशेला तुती, शेवगा, हादगा, पांगरा, शेवरी, बांबू यांसारख्या वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी. बागेच्या सभोवार चिलारी, शेवरी, मेंदी, एरंड, करवंद इत्यादी मध्यम उंच कुंपण झाडांची लागवड करावी. मुख्य फळझाडे लहान असतील तर रब्बी हंगामात फळझाडांच्या पट्ट्यात दाट पसरणारी पिके (हरभरा, फ्रेंचबीन्स, वाटाणा, पानकोबी) यांची लागवड करावी. पपई, केळी व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरीची लागवड फायदेशीर ठरते.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नियंत्रणाचे उपाय
थंडीची पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये सायंकाळी विहिरीच्या पाण्याने ओलित करावे. कारण विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते. झाडाच्या आळ्यात तणीस, गवत, पालापाचोळा, गव्हाच्या तुसाचे आच्छादन करावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती केळीची पाने गुंडाळावीत. रोपवाटिकेतील रोपे, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तणीस, गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे यांचे छप्पर उभारावे. असे खोपट सायंकाळी पाच वाजता घालावे, सकाळी लवकर काढून घ्यावे. म्हणजे दिवसभर रोपांना प्रकाश मिळू शकेल.

हेही वाचा - झेडपीचे शिक्षक कंत्राटी होणार, १५२ शिक्षकांवर कारवाई

छप्पर करण्यासाठी काळ्या पॉलिथिनचा वापर करावा. रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी ओला पालापाचोळा पेटवून धूर करावा. शिफारशीत प्रमाणात पालाशयुक्त वरखतांची (म्युरेट ऑफ पोटॅश) फवारणी करावी किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून झाडांच्या आळ्यात दिल्यास झाडाची जल व अन्नद्रव्ये शोषणाची, वहनाची क्षमता वाढते. झाडांची काटकताही वाढते. अति थंडीच्या काळात झाडांवर पाण्याचा फवारा मारावा. पाण्याच्या फवाऱ्याने झाडांच्या पानांचे तापमान योग्य राहून अति थंडीपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. केळीच्या घडांना बॅगचे आवरण करावे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

loading image