अरे हे काय? भुलथापा देऊन उरकून घेतला विवाह; तरुणीची फसवणूक

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 1 July 2020

जंगम मालमत्ता व बँक बॅलन्स असल्याची बतावणी करीत एका भामट्याने तरुणीला भुलथापा देत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीच्याशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळापूर, (जि.अकोला) : जंगम मालमत्ता व बँक बॅलन्स असल्याची बतावणी करीत एका भामट्याने तरुणीला भुलथापा देत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीच्याशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रज्वल वसोकार रा. नकाशी असे या भामट्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नकाशी प्रज्वल वसोकार या भामट्याने पारस येथे राहणाऱ्या अनीता नामक तरूणीशी लग्न करण्यासाठी तीला भुलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तीचा विश्वास संपादन करण्याकरीता व तीला शेती, बँक बॅलन्स व रग्गड पैसा असल्याचे त्याने भासवले. तीचा विश्वास संपादन केल्यावर प्रज्वलने सदर तरुणीशी एका मंदिरात प्रेमविवाह उरकून घेतला. त्याच्या घरी नकाशीला गेल्यावर तरूणीला सर्व प्रकार समजताच तिला धक्काच बसला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आरोपी प्रज्वलने आपल्याकडे जमीन, पैसा असल्याची बतावणी करून आपली फसवणूक केल्या प्रकरणी त्या तरूणीने थेट बाळापूर पोलिस ठाणे गाठून प्रज्वल वसोकार या भामट्याच्या विरोधात आज मंगळवारी (ता.३०) रोजी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Marriage ended by mistake; Cheating on a young woman