अकोला : चालत्या ट्रकला अचानक आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Medashi truck caught fire during running

अकोला : चालत्या ट्रकला अचानक आग

मालेगाव : अकोला रस्त्यावरील मेडशी गावाजवळ सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकच्या केबिनला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रक क्रमांक एमएच १८ बी ए ०१४३ राजस्थानमधील जोधपूर येथून हैदराबाद येथील करीमनगरकडे चुना पावडर घेऊन जात होता.

अकोला रस्त्यावरील मेडशी गावाजवळ आज सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. या भीषण आगीत ट्रकचा पुढील टायर आणि बॉडीचेही नुकसान झाले. ट्रकचालक महेश गुजर रा.महिदपूर सीटी मध्य प्रदेश व क्लिनरने ट्रक बाजूला उभा करून ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला.

घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन तडसे यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन आग विझवण्यासाठी पाठविले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांच्यासह मालेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव भगत, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मालेगाव नगर पंचायत, पातूर नगर परिषद आणि वाशीम नगर परिषदेच्या अग्निशमन दलांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

Web Title: Akola Medashi Truck Caught Fire During Running

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top