
Viral Post : माथी भडकविणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात विशीतील तरुणाई अग्रेसर; पोलिसांचं निरीक्षण
अकोला : अफवांवर विश्वास ठेवून सामाजिक व जातीय सलोखा बिगडविणारी व माथी भडकाविणारी पोस्ट व्हायलर करण्यात १९ ते ३० वयो गटातील तरूण अग्रेसर असल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
व्हायलर पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट होऊ नयेत म्हणून पोलिसांचा सायबर विभाग सातत्याने सायबर पेट्रोलिंगमधून सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. कायद्यात अडकल्यानंतर तरूणांना त्याचा पश्चाताप होतो. मात्र, ही वेळच येऊ नये यासाठी कोणतीही पोस्ट विचारपूर्वक व्हायलर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
अकोला शहरात ता. १३ मे रोजी अशाच तरुणांनी व्हायलर केलेल्या एका पोस्ट वरून दोन समाजात संघर्ष झाला. त्यातून एकाचा बळी गेला व अनेकांची वित्तीय हानी झाली. दोन समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या अशा पोस्ट व्हायलर होत असल्याने पोलिस अधीक्षक संदिप घुगे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी सोशल मीडियाचे माध्यमातून पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्व प्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलिस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोली टिम तंत्रज्ञान व विशेष दुताच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईडवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांची सोशल मीडिया पेट्रालिंग नियमीत सुरू असते, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. जुने विवादीत बाबींचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवून सोशल मीडियाचे माध्यमांतून निराधार व खोटी अफवा पसरवून जाती, जातीत तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालून निष्पाप तरुणाईचे डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाज मन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतून दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले.
तरुणांनो व्यक्त होताना विचार करा!
गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश प्रमाणात १९ ते ३० वयोगटातील तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेलली असते. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबद वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, घाई घाईने प्रतिउत्तर देताना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे.
कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर विशीष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
पोलिसच्या हेल्पलाईनची घ्या मदत
सोशल मीडिया हाताळतांना विशेष खबरदारी घेण्यात यावी. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तत्काळ पोलिसांच्या हेल्प लाईन क्रं ११२, किंवा नजिकच्या पोलिस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.