
अकोला : जातीय समीकरणे ठरविणार उमेदवार!
अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ता. ३१ मे रोजी महिलांचे आरक्षण जाहीर होईल. त्यानंतर अकोला मनपा क्षेत्रातील ३० प्रभागातील ९१ जागांसाठी उमेदवार हे जाती समिकरणावर ठरविले जातील. त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यातही ओबीसींचे राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूक होत असल्याने राजकीय सर्वच पक्षांकडून खुल्या जागांवर ओबीसींच्या उमेदवारीबाबत मंथन सुरू झाले आहे.
त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अकोला महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २० वरून ३१ झाली आहे. त्यासोबतच सदस्यांची संख्याही वाढली असून, ८० वरून ९१ झाली आहे. त्यात ४६ जागा या महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जातीसाठी १५ जागा आणि अनुसुचित जमातीसाठीदोन जागा राखीव राहतील. त्यातील आठ जागा अनुसुचित जाती महिलांसाठी व एक जागा अनुसुचित जाती महिला सदस्यासाठी राखीव राहील. उर्वरित ७४ जागा सर्वसाधारण राहणार असून, त्यातील ३७ जागा महिलांसाठी राखीव होतील. अनुसुचित जाती व जमातीसाठी राखीव होणाऱ्या प्रभागांचे अंदाज आधीच बांधण्यात आल्याने व राखीव प्रभाग कोणते हे जवळपास निश्चित असल्याने त्यादृष्टीने उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होत असल्याने सर्व राजकीय पक्षांना ओबीसीतील इच्छुकांना खुल्या प्रवर्गातील जागांवरून उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अशी आहे लोकसंख्या
एकूण लोकसंख्या ः पाच लाख ३६ हजार ५४०
अनुसूचित जाती ः ९० हजार ९१२
अनुसूचित जमाती ः ११ हजार ५७४
अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या
१) प्रभाग क्र. ३० ः ९७४
२) प्रभाग क्र. २९ ः ८२५
अनुसुचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रभाग
१) प्रभाग क्र. ४ ः ८८२३
२) प्रभाग क्र. १० ः ५९४४
३) प्रभाग क्र. २० ः ५९४०
४) प्रभाग क्र. १९ ः ५३९७
५) प्रभाग क्र. १४ ः ५०८६
६) प्रभाग क्र. ३० ः ५०७७
७) प्रभाग क्रं. २७ ः ४७५०
८) प्रभाग क्रं. ६ ः ४७०३
९) प्रभाग क्र. ३ ः ३७४१
१०) प्रभाग क्र.२५ ः ३५६६
११) प्रभाग क्र. २३ ः ३१११
१२) प्रभाग क्र. ५ ः ३१००
१३) प्रभाग क्र. २ ः ३०८२
१४) प्रभाग क्र. १२ ः २८८८
१५) प्रभाग क्र. ९ ः २८३२
Web Title: Akola Municipal Corporation Elections Candidates To Decide Reservation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..