अकोला : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

मनपा निवडणूक : इच्छुकांची उत्सुकता वाढली; १ जुलैपर्यंत हरकती, सूचना स्वीकारणार
Akola Municipal corporation elections new Ward structure
Akola Municipal corporation elections new Ward structuresakal

अकोला : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी गुरुवार, ता. २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी अकोला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आणि अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय तसेच प्रभागाची यादी संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये (झोन कार्यालय) पाहण्यास उपलब्ध राहील.

नागरिकांनी त्यांचे नाव त्यांच्या प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगच्या सूचनेनुसार ता. ३१ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत. ता. ३१ मे २०२२ रोजीच्या विधानसभा मतदार यादीमध्ये ज्यांची नावे आहेत, अशा मतदारांनाच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

मनपा कार्यालयात हरकती, सूचना स्वीकारणार

मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी शुद्ध स्वरुपात व त्रुटीविरहीत होण्याच्या दृष्टीने सदर यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येत आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ता. २३ जून ते १ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत असणार आहे. अकोला महानगरपालिका निवडणूक कार्यालय, येथे हरकती व सूचना दाखल करता येईल.

या चुकांची होणार दुरुस्ती!

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतील. तरी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी कृपया आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये असल्याची खातरजमा करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com