अकोला : मॉन्सून तोंडावर, नालेसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nala

अकोला : मॉन्सून तोंडावर, नालेसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष

अकोला - शहरातील सांडपाणी वाहून नेणारे छोटे-मोठे नाले मोर्णा नदीला जाऊन मिळतात. या नाल्यांची सफाई न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्‍भवतो. शिवाय मॉन्सूनमध्ये पावसाचे पाणी शहरात तुंबण्याची समस्या उद्‍भवू शकते. त्यामुळे मॉन्सून सुरवात होण्यापूर्वी हा गंभीर प्रश्न सोडविण्याची विनंत माजी महापौर विजय अग्रवाल यांनी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिका हद्दीत ११० मोठे नाले व २५० च्या जवळपास लहान-मोठ्या नाल्या आहेत. या नाल्यांची साफसफाई दरवर्षी महानगरपालिका प्रशासनाकडे केली जाते. यावर्षीसुद्धा एप्रिलमध्येच सफाईच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, हे काम गांभिर्याने होताना दिसत नाही. शिवाय कामाची प्रगतीही खूपच हळूहळू असल्याने साफसफाई युद्धस्तरावर करून ता. ७ जूनच्या आधी सफाईचे काम संपविण्याची सूचना माजी महापौर व भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे. यंदा मॉन्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नाले साफसफाईच्या कामाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरच आहे. यापूर्वी ता. २१ जुलै २०२१ रोजी अकोला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे व नाले सफाईचे काम न झाल्याने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. अनेकांच्या दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. या सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कटाक्षाने आरोग्य विभाग, बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा प्रशासनाने सफाईच्या कामाला वेग देण्याची मागणी अग्रवाल यांनी केली आहे.

Web Title: Akola Municipal Corporation Ignores Nalasafai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top