अकोला : मनपा बघतेय २१९ इमारती पडण्याची वाट!

शिकस्त इमारती पाडण्याबाबत उपाययोजना नाही; नोटीस बजावून प्रशासन मोकळे
old construction building will collapse
old construction building will collapse

अकोला : पावसाळा सुरू झाला आहे. अशात महानगरपालिका हद्दीतील शिकस्त इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चारही झोनमध्ये एकूण २१९ शिकस्त इमारती असून, त्या पाडण्याबाबत कोणत्याही उपाययोजना मनपा प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. केवळ नोटीस बजावून प्रशासन मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

अकोला महानगरपालिकेच्या चारही झोनमध्ये एकूण २१९ शिकस्‍त इमारती असल्याचा अहवाल मनपा प्रशासनानेच दिला आहे. या इमारतींपैकी आजही अनेक इमारतीत नागरिक राहतात. पावसाळ्यात या इमारती धोकादायक ठरू शकतात व मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे या इमारती खाली करून घेत नागरिकांचे पुनर्वसन करणे व शिकस्त इमारती पाडण्याची कारवाई करण्याबाबत उपाययोजना करण्यावर प्रशासनाकडून तातडीने पावले उचलणे आवश्यक होते. मात्र, मनपा प्रशासनाकडून केवळ नोटीस बजावण्यात आल्यात. त्यापुढे कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.

आमदारांच्या बैठकीतही गाजला होता मुद्दा

अकोला शहरातील चारही झोनमध्ये येणाऱ्या २१९ शिकस्त इमारतींना नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यापुढील उपाययोजना करण्याबाबत या महिन्यातच झालेल्या आमदारांच्या बैठकीत सूचना दिल्या होत्या. हा बैठकीत हा मुद्दा गाजला होता. त्यानंतरही मनपा प्रशासनाकडून गांभिर्याने उपाययोजना होताना दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com