अकोला : अखेर टॉवर ते रतनलाल प्लॉट रस्त्याचे काम सुरू

रस्त्याचे काम तीन वर्षांपासून होते अर्धवट
Akola municipal corporation Tower to Ratanlal Plot road construction work start
Akola municipal corporation Tower to Ratanlal Plot road construction work start

अकोला : टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट या रस्त्यावरील स्टेट बँकेकडील बाजूचा रस्ता अर्धवट अवस्थेत होता. अखेर या रस्त्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. स्टेट बँकेच्या आवार भिंतीचा प्रश्न न्यायालयात पोहोचल्यामुळे हा रस्ता तीन वर्षांपूर्वी अर्धवट सोडून देण्यात आला होता. एलआयसी कार्यालयापासून ते टॉवरपर्यंत या रस्त्यावरील एकाच पदारचे काँक्रिटीकरण झाले होते. मनपाने स्टेट बँकेची आवार भिंतही पाडली होती.

मात्र, त्यानंतरही रस्त्याचे काम सुरू होण्यास तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला. बुधवारपासून या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मात्र, याच रस्त्यावर हॉटेल स्कारलार्कपुढे मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात अद्याप मनपाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com