दिवाळी बाजारातील गैर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची पाच पथके

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 10 November 2020

जिल्ह्यामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. या सणानिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दिवाळीच्या सनानिमित्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता गर्दी होते. या गर्दीचा गैरफायदा घेवून महिलांची छेडखानी, धक्काबुक्कीच्या व विनयभंगाच्या घटना घडतात. त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अकोला ः जिल्ह्यामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. या सणानिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दिवाळीच्या सनानिमित्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता गर्दी होते. या गर्दीचा गैरफायदा घेवून महिलांची छेडखानी, धक्काबुक्कीच्या व विनयभंगाच्या घटना घडतात. त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

बाजारपेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, पाकिटमारी, बॅग लिफिटींग अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या घटना तसेच मालमत्तेविषयी गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नये यावर नियंत्रणा ठेवण्याकरिता अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे एकूण पाच पथके गठीत केली आहेत.

त्यामध्ये पोलिस मुख्यालय, अकोला येथील १५ पोलिस कर्मचारी, पोलिस स्टेशन -सिटी कोतवाली ५ कर्मचारी असे एकूण २६ कर्मचारी तसेच यावर नियंत्रणाकरिता संपूर्ण कोतवाली मार्केट तसेच गांधी चौक परिसरात सिटी कोतवाली चौक ते चांदेकर चौक, गांधी चौक ते ताजनापेठ चौकी, कोतवाली चौक ते अकोट स्टॅन्ड, किराणा बाजार गल्ली ते गांधी चौक परिसर, जुना कपडा बाजार गल्ली, चांदेकर चौक ते फतेह चौक या परिसरात पायी पेट्रोलिंगकरिता पोलिस कर्मचारी तसेच इतस्त्र संपूर्ण बाबींवर नियंत्रणाकरिता पोलिस उपनिरीक्षक- दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गर्दीचे वेळी मालमत्तेचा गुन्हा होवू नये याकरिता लक्ष ठेवणे कामी (१) गांधी चौक (२) सराफा चौक (३)जयहिंद चौक (४)खदान पोलीस चौकी (५) जठारपेठ चौक या ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले असून या गर्दीवर लक्ष ठेवणे कामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांना अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पोलिस अधिकारी ,कर्मचारी तसेच पोलिस नियंत्रण कक्ष ,अकोला फोन नं.०७२४.२४३५५०० किंवा १०० या क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola New: Five squads of police to curb irregularities in Diwali market