अकोला : १५ हजार क्विंटल हरभरा खरेदीचे नवे उद्दिष्ट

सहसचिवांचे संबंधित संस्थांना निर्देश, एफसीआयचे उद्दिष्ट नाफेडकडे वर्ग
Akola New target for gram purchase 15000 quintals
Akola New target for gram purchase 15000 quintalssakal

अकोला : हंगाम २०२१-२२ मधील हरभरा खरेदीबाबतचे भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) शिल्लक राहिलेले उद्दिष्ट नाफेडकडे वर्ग करून, जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील पंधरा हजार क्विंटल हरभरा खरेदीबाबत नवे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून, संबंधित हरभरा खरेदी करणाऱ्या संस्थांना राज्याच्या सहसचिवांनी नव्या उद्दिष्टानुसार हरभरा खरेदीचे निर्देश सुद्धा दिले आहेत.

या नव्या उद्दिष्टानुसार हरभरा खरेदीची कार्यवाही करावी तसेच खरेदी करताना केवळ शेतकऱ्यांकडूनच हरभरा खरेदी करवा. त्याचबरोबर ७/१२ उताऱ्यावरील फक्त हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात उत्पादकतेनुसार हरभरा खेरदी करण्याची दक्षता घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य शासनाचे सहसचिव डॉ. सुग्रिव धपाटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, नाफेड मुंबई शाखा व्यवस्थापक, भारतीय अन्न महामंडळ मुंबईचे शाखा व्यवस्थापक व वॅपको नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे निर्देशित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com