हे तर नवलंच! महिला व बाल विकास विभागातून बारा फाईली गहाळ

सुगत खाडे  
Saturday, 29 August 2020

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महिला व बाल विकास विभागातील बारा फाईली गहाळ झाल्या आहेत.बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल) व शुभ मंगल सामूहिक विवाह योजनेच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिल्यानंतर अचानक फाईली गहाळ झाल्यामुळे सदर फाईलींचा शोध कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी घेत आहेत.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महिला व बाल विकास विभागातील बारा फाईली गहाळ झाल्या आहेत.

बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल) व शुभ मंगल सामूहिक विवाह योजनेच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिल्यानंतर अचानक फाईली गहाळ झाल्यामुळे सदर फाईलींचा शोध कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी घेत आहेत.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?.

असे असले तरी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील पथक अकोला कार्यालयात दाखल झाले आहे.

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला आणि बालकांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन
त्यासाठी विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना सुद्धा चालवण्यात येतात. या योजनांपैकी विभागामार्फत २०१८-१९ मध्ये बाल संगोपन योजना व शुभ मंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात आली.

सदर योजनेचा १२ लाभार्थ्यांना लाभ देवून लाभार्थ्यांच्या खात्यात तीन लाख १९ हजार रुपये वळती सुद्धा करण्यात आले. परंतु त्यानंतर सदर योजनेच्या फाईल कार्यालयातून अचानक गायब झाल्या आहेत. त्यामुळे महिला व बाल विकास अधिकारी योगेश जावादे यांनी यासंबंधी विभागाच्या आयुक्त कार्यालयात माहिती दिली.

बँकेला अंधारात ठेवून विकल्या शेळ्या, कर्ज घेतल्यानंतर १९ लाखांने फसवणूक

त्यावर गहाळ झालेल्या फाईलींचा शोध घेण्यासाठी विभागीय पथक अकोल्यात दाखल झाले आहे. पथकात लेखा अधिकारी तिनखेडे यांच्यासह इतरांचा सहभाग आहे. तपास अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून कार्यालयात गहाळ झालेल्या फाईलींचा शोध घेण्यात येत आहे.

तत्कालीन परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचे असहकार्य
गहाळ झालेल्या फाईली तत्कालीन परिविक्षाधीन अधिकारी फय्याजूद्दीन सैय्यद यांच्याकडे होत्या. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी सैय्यद यांच्याकडून फाईलींची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सैय्यद सेवानिवृत्त झाल्यामुळे ते तपासात व फाईलींचा शोध घेण्यास असहकार्य करत असल्याची माहिती कार्यालय प्रमुखांनी दिली.

 रेशन दुकानदारांचे कमिशन सरकारी तिजोरित!

महिला व बाल विकास विभागातील बाल संगोपन योजना व शुभ मंगल सामूहिक विवाह योजनेच्या बारा फाईल गहाळ झाल्या आहेत. त्याचा शोध घेण्यात येत आहे. गहाळ झालेल्या फाईलींसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाला आम्हीच माहिती दिली होती. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विभागीय पथक दाखल झाले आहे.
- योगेश जवादे
महिला व बाल विकास अधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Twelve files missing from Women and Child Development Department