esakal | कोरोनाच्या १५७ चाचण्या, सहा पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 157 corona tests, six positive

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहेत. यात गुरुवारी (ता. ५) दिवसभरात १५७ चाचण्या झाल्या.

कोरोनाच्या १५७ चाचण्या, सहा पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहेत. यात गुरुवारी (ता. ५) दिवसभरात १५७ चाचण्या झाल्या.

त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


अकोला ग्रामीण, बार्शीटाकळी, अकोट व पातूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. बाळापूर येथे सात चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तेल्हारा येथे ३६ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मूर्तिजापूर येथे आठ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला आयएमए येथे २८ चाचण्या झाल्या, त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ३८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

वैद्यकीय महाविद्यालय येथे ३७ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या, त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top