esakal | आज न्याय न मिळाल्यास दुपारी पिंड पाडून तेरवी करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: On the 6th day of Warkari fast, Shete Maharaj's health is very worrying

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वारकऱ्यांच्या उपोषणाला रविवारी (ता. ६) सहावा दिवस उजाडला. परंतु आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झालेला नाही आणि आज सलग सहा दिवसांच्या आमरण उपोषणामुळे गणेश महाराज शेटे यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे.

आज न्याय न मिळाल्यास दुपारी पिंड पाडून तेरवी करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वारकऱ्यांच्या उपोषणाला रविवारी (ता. ६) सहावा दिवस उजाडला. परंतु आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झालेला नाही आणि आज सलग सहा दिवसांच्या आमरण उपोषणामुळे गणेश महाराज शेटे यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे.

त्यामुळे सरकार वारकऱ्यांसाठी मेले असे, गृहित धरून सरकारची पिंड पाळून तेरवी विधी साजरी करू आणि तेरवीचा, कीर्तनाचा कार्यक्रम धर्माचार्य हभप गजानन महाराज दहिकर यांचा राहिल. त्यामुळे आंदोलनस्थळी विदर्भातील सर्व भाविकांनी सोमवारी (ता. ७) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणामध्ये रविवारी (ता. ६) हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांची प्रवचन सेवा पार पडली. महाराजांनी अति परखड शब्दांमध्ये सरकारला सांगितले की, आम्ही वारकरी एक संघटित आहोत आणि आमच्या हक्का करीता जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत.

सरकारने वारकऱ्यांचा अंत पाहू नये, हा लढा कुण्या एकट्या महाराजांचा नसून संबंध महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आहे. सरकारने वारकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी प्रवचनादरम्यान केले.

आमरण उपोषणाला आमदार गोवर्धन शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली व अनेक राजकीय नेते उपोषणाला भेट देत आहेत. उपोषणाला भेट देण्याकरता येणाऱ्या संत मंडळींची भोजनाची व्यवस्था काळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

रविवारी (ता. ६) उपोषण स्थळी महादेव महाराज निमकडे, विठ्ठल महाराज साबळे, गजानन महाराज महल्ले, राम महाराज गवारे, तुलशिदास महाराज मसने, शिवा महाराज बावस्कर, प्रवीण महाराज कुलट, ज्ञानेश्वर महाराज पातोड, श्रीधर महाराज तळोकार व इतर उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)