भारतीय सैन्यात सोळा वर्षे सेवा दिल्यानंतर ते युवकांना देतात सैन्यभरतीचे प्रशिक्षणत 

विवेक मेतकर
Wednesday, 19 August 2020

भारतीय सैन्यात राहून सोळा वर्षे देश सेवा करणारे सैनिक उमेश वामनराव नागे यांनी निवृत्तीनंतरही देशसेवा कायम ठेवली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील आळंद येथील या जवानाने सेवानिवृत्तीनंतर युवकांना सैन्यभरतीचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.

पिंजर (जि.अकोला)  ः भारतीय सैन्यात राहून सोळा वर्षे देश सेवा करणारे सैनिक उमेश वामनराव नागे यांनी निवृत्तीनंतरही देशसेवा कायम ठेवली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील आळंद येथील या जवानाने सेवानिवृत्तीनंतर युवकांना सैन्यभरतीचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.

देशसेवेचे धडे वडिलांकडून मिळालेल्या उमेशने सैन्यातील सेवानिवृत्तीनंतर लोकसेवा म्हणून गरीब व होतकरू मुलांना आर्मी, पोलिस, सीआरपीएफ आदी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. कुणाकडून एक पैसाही न घेता त्यांनी युवकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांना युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची सैन्य भरतीपूर्व अकादमीच सुरू झाली. सध्या त्यांच्या अकादमीमध्ये एकूण ७० युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. ज्या मुलांची बूट घ्यायची परिस्थिती नव्हती त्यांना उमेश यांनी बूट व टी-शर्ट घेण्यासाठी मदत केली. कुणाला ऑनलाइन फॉर्म भरायला पैसे नसतील त तेही उमेश देतात. गाडीमध्ये पेट्रोल स्वतः पैशाने भरून मुलांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जातात.
 
पहिल्याच प्रयत्नात अनेक विद्यार्थी यशस्वी
प्रशिक्षण दिलेल्या ६० मुलांनी पहिल्याच भरतीवर ग्राऊंड टेस्ट पास केली. काही मुलांना शारीरिक कमी मुळे वगळण्यात आले. सैन्यात नऊ मुलांना भरती होता आले. मुलांना व मुलींना कोरोनामुळे ऑनलाइन ट्रेनिंग निशुल्क देण्यास सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news After sixteen years of service in the Indian Army, they provide recruitment training to the youth