कोई सरहद ना इन्हे रोके!, अकोल्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके! या जावेद अख्तर यांच्या ओळी सार्थ ठरवत विदेशी पक्षी अकोल्यात दाखल झाले आहेत.

अकोला  ः पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके! या जावेद अख्तर यांच्या ओळी सार्थ ठरवत विदेशी पक्षी अकोल्यात दाखल झाले आहेत.

येथील काही पक्षी अभ्यासकांनी नुकतेच अकोल्या जवळील कापशी तलावानजिक बार हेडेड गुज अर्थात राजहंस व प्रॅटिन कोल अर्थात आर्ली या पक्षांचे थवे पाहुन त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षीप्रेमी, अभ्यासकांना पर्वणी ठरली आहे.

गुलाबी थंडी सुरू झाली की पाणथळ प्रदेश, झाडेझुडपे, जंगल असलेल्या भागात विविध रंगीबेरंगी विदेश पाहुणे पाहाला मिळतात. अकोला जिल्ह्यातही देशाच्या इतर भागासोबतच विदेशी पक्षांचे आगमणही सुरू झाले आहे. त्यामुळे येणारा काळ पक्षी निरीक्षकांसाठी परवणी ठरणार आहे.


पक्षी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे ऋतुमानानुसार अधिवासात बदल करणे. स्थानिक प्रतिकूल परिस्थितीमुळे हे पक्षी अनुकूल वातावरणात स्थलांतरीत होतात. पक्ष्यांच्या विणीचा हंगाम अन्नाच्या उपलब्धतेशी जोडलेला असतो.

विणीच्या हंगामात पिलांना मुबलक प्रमाणात पोषक अन्न पुरवावे लागते. हे अन्न पचायला सुलभ असावे लागते. त्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असावे लागते. वनस्पतींची मुकुले, फुलांचे भाग, काही फळे, काही बिया व अंकुर अशा वेचक अन्नाबरोबर अनेक कीटकांच्या अळ्यासुद्धा अन्न म्हणून उपयोगी असतात.

कीटकांचे जीवनचक्र पावसाळ्यानंतर फुलणाऱ्या वनस्पती जीवनाशी जोडलेले असते. पक्ष्यांचे स्थलांतर आकाशमार्गे होते आणि त्यांचा उड्डाणमार्ग बहुधा निश्चित असतो. स्थलांतर करणारे पक्षी बहुधा मोठ्या थव्यांनी विशिष्ट रचनेत उड्डाण करतात.

असा पक्ष्यांचे स्थलांतरणासाठी विदर्भात हिवाळा हा सर्वोत्तम काळ असतो. अकोला जिल्ह्यातही अशा पक्षांचे आगमण पाणवठ्यांवर सुरू झाले असल्याची माहिती अकोलाचे पक्षी संशोधक लक्ष्मीशंकर यादव यांनी दिली.

अकोला जिल्ह्यात आढळलेले विदेशी पावणे
बी-ईटर, बार टेल्ड गाडविट, नार्दन शावलर, पिवळा परिट, थिरथिरा, चातक, ग्रे हेडेड मैना, गुलाबी मैना, गप्पीदास, हेरान, गुलाबी मैना, कस्तूरी आदी विदेश पावण्याचे आगमण अकोला जिल्ह्यात झाले आहे. पक्षी निरक्षकांनी ही संधी साधत त्यांना कॅमेराबद्ध केले आहे.

अकोल्यातील पक्षी संशोधक लक्ष्मीशंकर यादव यांनी या विदेशी पावण्यांना कापशीसह इतर पाणवठ्यावर त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

(संपादन - विवेक मेतकरः


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Arrival of migratory birds in Akola