भयंकर! माणसाच्या जीवापेक्षा दारूची उधारी झाली मोठी, एकाला पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न

प्रवीण राजपूत
Monday, 7 September 2020

दारू उधारीचे १० रुपयांसाठी अवैध दारू विक्रेत्याने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री ९ वाजेदरम्यान घडली. तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले असून, ग्राम देवधाबा मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. दारू विक्रेत्यांची उधारीचे पैसै वसुल करण्यासाठी जिवंत माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहचली आहे.

मलकापूर (जि.बुलडाणा) : दारू उधारीचे १० रुपयांसाठी अवैध दारू विक्रेत्याने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री ९ वाजेदरम्यान घडली. तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले असून, ग्राम देवधाबा मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. दारू विक्रेत्यांची उधारीचे पैसै वसुल करण्यासाठी जिवंत माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहचली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय ४५) हा गावातील अशोक गणपत भिसे यांचे घरी दारू पिण्यासाठी गेला. दारू मागितली असता यावेळी भिसे याने मागील उधारीचे दहा रुपये दे मग दारू देतो, असे म्हटले असता दोघांत वाद झाला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशोक भिसे याने घरात जाऊन बिसलरी बॉटलमध्ये पेट्रोल आणले व काशिनाथ राजाराम उगले याच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिस लावून पेटवून दिले. यात उगले गंभीर जळाला. त्यास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यांचे विरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यास अटक केली आहे.

आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. उगले याची प्रकृती चिंताजनक असून त्यास उपचारार्थ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तायडे करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Attempt to burn alive for ten rupees borrowed liquor