अकाेलेकर एड्सपासून सजग; प्रमाण घटलं!

Akola News: Awareness from Akolekar AIDS; The proportion decreased!
Akola News: Awareness from Akolekar AIDS; The proportion decreased!

अकाेला: दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एड्स, एचआयव्ही या नावानेही अनेकांना भिती वाटते. त्यामुळेच की काय पण या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळतेय. जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या प्रमाणात सातत्याने घट हाेत आहे. एकूणच हे चित्र अकाेलेकर या आजाराचे विषयी सजग हाेत असल्याचे दिसून येत आहे.

काही वर्षांआधी एचआयव्ही एड्स नावाच्या भस्मासुराने अवघा देश ढवळून काढला होता, मात्र अवघ्या काही वर्षांत एचआयव्ही एड्सच्या संदर्भात घडून आलेले बदल अचंबित करणारे आहेत. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या कामगिरीमुळे आणि वारंवार हाेणाऱ्या जनजागृतीमुळे भितीदायक अशा या आजाराच्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी हाेताना दिसत आहे. यावर्षी २०२०च्या एप्रिलपासून ऑक्टाेबरपर्यंतच्या सात महिन्यात जिल्ह्यात ७६ रुग्णच एड्स बाधित आढळले आहेत. त्यामुळे एड्सला थांबवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे.


काय म्हणते आकडेवारी
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार २००७ मध्ये एड्स बाधित रुग्णांची संख्या ८७१ हाेती. त्यानंतरच्या वर्षात रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळपास राहिली. परंतु २०१४ नंतर एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत आहे. २०१७-१८ मध्ये रुग्णांची संख्या ३९८ होती. त्यानंतर २०१८-१९ मध्ये २७९, २०१९-२० मध्ये ३३७, २०२०-२१ (ऑक्टोंबरपर्यंत) मध्ये ७६च रुग्ण सापडले आहेत.


वर्षनिहाय एड्स बाधितांची संख्या
वर्ष तपासणी घटलेले प्रमाण
२०१७-१८ ५६७६० ३९८
२०१८-१९ ६०१६९ २७९
२०१९-२० ९२२५४ ३३७
२०२०-२१ ३३८२३ ७६

गरोदर महिलांमध्ये सुद्धा प्रमाण घटले
जिल्ह्यातील सामान्य एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. त्याचप्रमाणे गरोदर मातांमध्ये सुद्धा एचआयव्हीचे प्रमाण कमी झाले आहे. २०१७-१८ मध्ये ५० हजार ५४५ गदोदर महिलांची तपासणी केल्यानंतर २० महिला एचआयव्ही बाधित आढळल्या होत्या. २०१८-१९ मध्ये ५८ हजार ८१९ महिलांची तपासणी केल्यानंतर २२, २०१९-२० मध्ये ५६ हजार ७५० तपासणी केल्यानंतर १४ व २०२०-२१ मध्ये ३० हजार ३४० महिलांची तपासणी केल्यानंतर ६ महिलाच एचआयव्हीग्रस्त आढळल्या. म्हणजेच रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com