esakal | पुन्हा दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Both die again; 23 new positives

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी दोन रुग्णाचा शुक्रवारी (ता. २) बळी गेला. त्यासह २३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २४१ झाली असून पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा बाराशेपर्यंत पोहचली आहे.

पुन्हा दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी दोन रुग्णाचा शुक्रवारी (ता. २) बळी गेला. त्यासह २३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २४१ झाली असून पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा बाराशेपर्यंत पोहचली आहे.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचे रुग्ण महानगरानंतर आता ग्रामीण भागात सुद्धा आढळत आहेत. दरम्यान कोरोना रुग्ण तपासणीचे ३५८ अहवाल शुक्रवारी (ता. २) प्राप्त झाले.

त्यापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह तर ३३५ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा बळी सुद्धा कोरोनामुळे गेला. त्यातील एक रुग्ण गितानगर, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष होता. त्याला २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण तिवसा बार्शीटाकली येथील ६२ वर्षीय महिला होती. तिला १९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

याव्यतिरीक्त शुक्रवारी सकाळी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळले. त्यात सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन, संतोष नगर येथील दोन तर उर्वरित कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवत वाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

सायंकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राधकिसन प्लॉट येथील दोन तर उर्वरित कौलखेड, जानोरी, शिवनगर, अंबिका नगर, खडकी बार्शीटाकली व नवीन बसस्टँड जवळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


१७४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १५, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, अवघते हॉस्पीटल मूर्तिजापूर येथून तीन, सूर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रेजीन्सी येथून नऊ तर हॉटेल स्कायलार्क येथून सहा जण अशा एकूण ६८ जणांना शुक्रवारी (ता. २) डिस्चार्ज देण्यात आला. त्याव्यतिरीक्त गुरुवारी (ता. १) १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक, हॉटेल स्कॉयलार्क येथून पाच तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १०० जणांना, अशा एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. दोन दिवस मिळून १७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७५७२
- मृत २४१
- डिस्चार्ज - ६२०९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ११२२

(संपादन - विवेक मेतकर)