मृत्यूला ब्रेक, १८ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 15 October 2020

कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांची संख्या घटली असली तरी अकोला जिल्ह्यात मृत्यू सत्र थांबत नव्हते. गेले कित्तेक दिवसानंतर प्रथमच मृत्यूला ब्रेकला लागला असून, बुधवारी नव्या १८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांची संख्या घटली असली तरी अकोला जिल्ह्यात मृत्यू सत्र थांबत नव्हते. गेले कित्तेक दिवसानंतर प्रथमच मृत्यूला ब्रेकला लागला असून, बुधवारी नव्या १८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे १४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२४ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटिव्ह आले. आज दिवसभरात ३७ रुग्ण बरे झाले. बुधवारी सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

त्यात तीन महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील तीन जण, अकोट व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित कान्हेरी सरप, कृषिनगर, शिवनी, हिसपूर ता.मुर्तिजापूर, सागर कॉलनी, संतोष नगर, दहीहांडा ता. अकोट, फडके नगर व छोटी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुष असून ते गोकुल कॉलनी व कैलास नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

३७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५ जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, आर्युवेदिक हॉस्पिटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून सहा जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून दोन जणांना अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

३७४ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ७८९८ आहे. त्यातील २६० जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७२६४ आहे. सद्यस्थितीत ३७४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना मीटर
- एकूण पाॅझिटिव्ह - ७८९८
- मृत - २६०
- डिस्चार्ज - ७२६४
- ॲक्टिव्ह रुग्ण - ३७४

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Break to death, 18 new positives