एका तासात नववधूचा केला ऑनलाईन मेकअप, लिना आर्य यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 23 December 2020

प्रत्येक नववधूला तिने लग्नाच्या दिवशी सुंदर आणि सर्वांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटत असतं. लग्नसोहळ्यात मेकअप करताना तिला तिच्या मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसरची नक्कीच मदत होते. मात्र लग्नसोहळ्याआधी आणि नंतरही असे अनेक विधी असतात. जेव्हा तिला स्वतःच तयार होणं गरजेचं असतं.

अकोला : प्रत्येक नववधूला तिने लग्नाच्या दिवशी सुंदर आणि सर्वांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटत असतं. लग्नसोहळ्यात मेकअप करताना तिला तिच्या मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसरची नक्कीच मदत होते. मात्र लग्नसोहळ्याआधी आणि नंतरही असे अनेक विधी असतात. जेव्हा तिला स्वतःच तयार होणं गरजेचं असतं.

 ऑल इंडिया ब्युटी असोसिएशन (आयबा) आणि ब्राम्हणी इंटरनॅशनल व बिसा इंटरनॅशनल अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन मेकप आर्टीस्ट मेकअप प्रेझेंटेशनचे आयोजन केले होते.

हेही वाचा : 

Advertising
Advertising

त्यामध्ये संपूर्ण भारतातून ११४६ पेक्षा जास्त आर्टिस्टने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये अकोला येथील लीना आर्य (तनुश्री ब्युटी क्लिनिक , हेअर अँड स्किन केअर) या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व ब्युटी एक्स्पर्ट नी एका तासात नववधूचा मेकप ऑनलाईन केला. हा कार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या देखरेखीखाली केला गेला. मेकप आर्टीस्टंना प्रोत्साहन देणे व परंपरागत नववधू मेकअपला विश्वस्तरिय दर्जा देणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट होते.

हेही वाचा : कशी साजरी करणार थर्टी फर्स्ट? शासनाचा एक निर्णय अन् शहरवासीयांचा झाला हिरमोड!

असोसिएशनच्या सहसचिव डॉ. नीता पारेख यांनी सांगितले की, देशभरातील लगबग ११४६ पेक्षा जास्त मेकअप आर्टिस्टने एकाच वेळी ऑनलाइन एक तासात संपूर्ण नववधूचा मेकअप करून विश्व रेकॉर्ड केला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या पदाधिकाऱ्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या टीम ने प्रशस्ती पत्र प्रदान केले.

(संपादन - विवेक मेतकर)