esakal | ज्ञानगंगा व पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Buldana Gyanganga and Paldhag Medium Project Overflow

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे.

ज्ञानगंगा व पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे.

पलढग प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत साठा ७.५१ दलघमी असून, पूर्ण संचय पातळी ४०३.२० मीटर आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा प्रकल्पाचा संकल्पीत साठा ३३.९३ दलघमी आहे,

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तर पूर्ण संचय पातळी ४०४.९० मीटर आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेना भरला असून, सांडवा प्रवाहित झाला आहे. दे. राजा तालुक्यातील अंढेरा हा लघु पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी ६ वाजता १०० टक्के भरला आहे.


सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत येत असलेला ज्ञानगंगा १०० टक्के भरला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण भरून सांडवा प्रवाहित होवू शकतो. हीच परिस्थिती पलढग प्रकल्पाची सुद्धा आहे. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पूर येण्याची शक्यता आहे.

ज्ञानगंगा नदीकाठावरील ३६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, सारोळा, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिं. राजा, घाणेगाव, ज्ञानगंगापूर, दौडवाडा, नांदुरा तालुक्यातील वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगाव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, भुईसिंगा, निमगाव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, हिंगणा दादगाव, हिंगणा ईसापूर, दादगाव आणि शेगाव तालुक्यातील डोलारखेड व वरध गावांचा समावेश आहे. असे शाखा अभियंता, सिंचन शाखा, तांदुळवाडी यांनी कळविले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top