शेतकऱ्यांना बेड्या ठोकणाऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध हास्यस्पद- केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

Akola News: Congress and other opposition parties plot against agriculture law - Union Minister of State Sanjay Dhotre
Akola News: Congress and other opposition parties plot against agriculture law - Union Minister of State Sanjay Dhotre

अकोला  ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने तीन ऐतिसाहिक कृषी व कामगार कायदे केलेत. मात्र ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली बेड्या ठोकल्या होत्या तोच काँग्रेस पक्ष व अन्य विरोधी पक्षांतर्फे या कायद्याला विरोध करून शेतकऱ्यांची व कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सोमवारी (ता.५) अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.


केंद्र सरकारने पास केलेल्या कायद्यांबाबत सरकारची बाजून स्पष्ट करण्यासाठी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चनाताई मसने, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, जंयत मसने आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलाताना केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी स्वामिनाथ समितीचा अहवाल लागून करून शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वातील समितीने केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांची मागण्याप्रमाणे त्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळवून देणारे कायदे संसदेत पारित करण्यात आले आहेत.


विधेयकांवर संसदेत चर्चा सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व कोणत्याही विरोधी पक्षाने विधेयकातील तरतुदीला विरोध केला नाही. कायद्यात समाविष्ट नसलेल्या अन्य गोष्टींवरच विरोध पक्षांचे लक्ष केंद्रीत होते. यावरून काँग्रेस व अन्य पक्ष संवेदनशिल नसल्याचे दिसून येते असल्याचे ते म्हणाले. कायदेशीर बंधनातून शेतकऱ्यांना मुक्त करणारे कायदे पारित झाल्याने आता शेतकऱ्यांना त्यांचा माल राज्याबाहेरही जिथे चांगले दर मिळेल तेथे, कंपन्यांसोबत करार करून विकता येणार आहे.

त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. त्यासाठी हमी भावाची गरज भासणार नाही, असा दावा केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केला आहे. काँग्रेसने सुरूवातीपासून शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली बेड्या ठोकल्या आहेत. त्यातून त्यांना मुक्त करणाऱ्या कायद्याबाबत आता दिशाभूल करून विषेध करण्याचे राजकीय कट आखले जात असून, त्यात काँग्रेससह सर्वच पक्ष सहभागी असल्याचा आरोपही श्री धोत्रे यांनी केला. केंद्राचा कायदा राज्यातही लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


विरोध हास्यस्पद
कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था संपविण्याचा जाहिरनामा सन २०१९ मध्ये देणारे काँग्रेस आता शेतकऱ्यांना कायद्यातून मुक्त करणाऱ्या निर्णयालाही विरोध करीत आहे. उलट बाजार समितीची व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस व महाराष्ट्र सरकारने नवीन शेती विषयक कायद्याला दर्शविलेला विरोध हास्यास्पद आणि निव्वळ राजकीय असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी म्हणाले. शिवसेनेने लोकसभेत काद्याला पाठिंबा दिला. त्याच पक्षाचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत. राज्यसभेत चर्चेला शिवसेनेचे सदस्य उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही आवाजी मतदानाला उपस्थित नव्हते. यावरून राज्यातील तिघाडी सरकारमधील विरोधाभास दिसून येत असल्याचे ते म्हणाले.


अकोला पालकमंत्र्यांच्या आव्हानाला बगल
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नवीन कायद्यात हमी भावाबाबत उल्लेख केला तर भाजपमध्ये आजच प्रवेश घेण्याची तयारी असल्याचे आव्हान केंद्रातील सत्ताधारी भाजपला केले आहे. त्याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बच्चू कडू यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश कार्यकारिणीचा आहे, त्यावर मी काय बोलणार, असे सांगून त्यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com