जेईई नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसचे धरणे

चिखली: विनोद खरे
Thursday, 3 September 2020

कोरोना महामारीमुळे संपुर्ण देश वेठीस धरलेला असतांना विद्यार्थ्यांना परीक्षेस सामोरे जाण्याची वेळ सरकारने त्यांच्यावर आणुन ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवित्वाला संभाव्य धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे अशी पालकांची इच्छा नाही.

चिखली, (जि.बुलडाणा) : कोरोना महामारीमुळे संपुर्ण देश वेठीस धरलेला असतांना विद्यार्थ्यांना परीक्षेस सामोरे जाण्याची वेळ सरकारने त्यांच्यावर आणुन ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवित्वाला संभाव्य धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे अशी पालकांची इच्छा नाही.

तरी देखील लाखो विद्यार्थ्यांच्या व पर्यायाने संपूर्ण देशाच्या आरोग्याला घातक धोका निर्माण करु शकणाऱ्या या परीक्षा घेण्याचा हट्ट केंद्र सरकारने सोडावा, जेईइ व नीटची परीक्षा देण्यासाठी आग्रह करु नये या मागणीकरिता काँग्रेस पक्षाचे वतीने जिल्हाभर धरणे आंदोलन करण्यात आले असून, चिखली येथे ३१ ऑग्रस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासमवेत शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, डॉ. सत्येद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरुशे, असीफभाई, डॉ. इसरार यांच्या नेतृत्वात बसस्थानकावर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेततथा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत तेथे मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली तसेच नायब तहसिलदार यांना परीक्षा पुढे घेण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी गोकुल शिंगणे, तुषार बोंद्रे, प्रशांत देशमुख, भास्कर चांदोरे, पवन रेठे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Congress to hold JEE exams ahead