esakal | बांधकाम मजुरांना आजपासून मिळणार योजनांचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Construction workers will get the benefit of the scheme from today

 महाराष्ट्र इमारम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळव्दारा नोंदणीकृत मजुरांना त्यांच्या विविध योजनेचे अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांचेकडे मागील २ वर्षांपासून प्रलंबित होते.

बांधकाम मजुरांना आजपासून मिळणार योजनांचा लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : महाराष्ट्र इमारम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळव्दारा नोंदणीकृत मजुरांना त्यांच्या विविध योजनेचे अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांचेकडे मागील २ वर्षांपासून प्रलंबित होते.

या अर्जाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित विभागामार्फत कामगारमंत्री व कामगार विभागाचे सचिव तथा सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांचेशी अर्जा विषयी पाठपूरावा केल्यानंतर ता. ४ नोव्हेंबर २०२० रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांचेशी चर्चा केली.

त्यानंतर आयुक्त यांनी सर्व योजनाच्या माहिती दिली. या विषयी सर्व अर्ज ऑनलाईनवर टाकलेले आहेत. परंतू शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसहिंतेमुळे लाभाचे वाटप होवू शकले नाही.

आता सोमवार, ता. ७ डिसेंबरपासून सर्व योजनाचा वाटप सुरू होणार आहे. नवीन नोंदणी बांधकाम मजुरांनी ऑनलाईन प्रध्दतीने सुमारे आठ हजार नोंदणी झाली असून, आजपर्यंत ४५०० मजुरांचे अर्ज निकाली निघाले आहेत.

उर्वरित अर्ज छाननी सुरू असून, लवकरात लवकर छाननी पूर्ण होईल व ता.७ डिसेंबर २०२० पासून स्मार्ट कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी चर्चे दरम्यान कळविले आहे.

सर्व मजूर बांधवांनी कार्यालयामध्ये गर्दी करू नये. ज्यांना कार्यालया मार्फत एसएमएसद्वारा सूचित केले, अशा मजुरांनीच कार्यालयामध्ये भेटावे.

या चर्चेकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असंघटीत कामगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिनकराव निकम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश नृपनारायण, संघटनेचे पदाधिकारी गणेश हिरळकर, मारोती असलमोल, सुनील इंगळे, जाकीर शाह, प्रामुख्याने उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top