कोरोना अपडेट; २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 7 December 2020

 कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. ६) २८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४५ झाली आहे. त्यासोबतच एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ६६० झाली आहे.

अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. ६) २८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४५ झाली आहे. त्यासोबतच एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ६६० झाली आहे.

जिल्ह्यात गत ९ महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग तपासणीचे ६५१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६२३ अहवाल निगेटिव्ह तर २८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात रविवारी (ता. ६) २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये नऊ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे.

त्यातील गोरक्षण रोड येथील सहा, तोष्णीवाल ले-आऊट येथील तीन, खदान येथील दोन, तर उर्वरित न्यु खेतान नगर, विद्युत कॉलनी, बाळापूर, सहित ता. बार्शीटाकळी, जनूना ता. बार्शीटाकळी, राजूराघाट धोत्रा, तापडीया नगर, पातूर, बार्शीटाकळी, केशवनगर, किनखेड, सिटी कोतवाली समोर, आश्रय नगर, नंदापूर ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. त्यासोबच सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन पुरूष असून ते रतनलाल प्लॉट व राम मंदिर जवळ अकोला येथील रहिवासी आहे.

३२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रविवारी (ता. ६) सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून तीन, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९६६०
- मयत - २९८
- डिस्चार्ज - ८७१७
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ६४५

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona Update; 28 new positive patients were found