कोरोना अपडेट; ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह; पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार १२०

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 25 November 2020

 कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २४) ६३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह तर ५८७ अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांमध्ये सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

अकोला  ः कोरोना संसर्ग तपासणीचे  ६३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह तर ५८७ अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांमध्ये सकाळी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

कोरोना संसर्गाचे ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०३ झाली असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार १२० झाली आहे. दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

त्यात सहा महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राम नगर व सहकार नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, पातूर, मोठी उमरी, चोहट्टा बाजार, जवाहर रोड, बहिणाबाई खरोटे कन्या विद्यालय, उमरी, पळसो बढे, जठारपेठ, देवरावबाबा चाळ, अकोट, गजानन महाराज मंदिर खदान, बाळापूर, पारस, रामदासपेठ, गोरक्षण रोड, देशमुख फैल, रणपिसे नगर, चिंचोली ता. बाळापूर, सिंधी कॅम्प, जोगळेकर प्लॉट व सांगवी बाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

हेही वाचा VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

त्यासह सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील परिवार कॉलनी व अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रिंग रोड, गोकूल कॉलनी, शिवाजी नगर, जठारपेठ, विद्युत नगर, सिंधी कॅम्प व शंकर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

२४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या ९ जणांना, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९१२०
- मृत - २८८
- डिस्चार्ज - ८३२९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५०३

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona Update; 45 new patients positive; The number of patients found positive is 9,120