esakal | कोरोनाचा कहर सुरूच; आणखी एकाचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona Update; Death of another; 29 new positives

कोरोना संसर्गामुळे गुरुवारी (ता. ३) एका रुग्णाचा मृत्‍यू झाला. त्यासह २९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळ जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७२ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९ हजार ५३० झाले आहेत.

कोरोनाचा कहर सुरूच; आणखी एकाचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्गामुळे गुरुवारी (ता. ३) एका रुग्णाचा मृत्‍यू झाला. त्यासह २९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळ जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७२ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९ हजार ५३० झाले आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. ३) ३९० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६१ अहवाल निगेटिव्ह तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

संबंधित रुग्ण सहकार नगर येथील ८७ वर्षीय पुरुष होता. त्याला २५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

याव्यतिरीक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक ये‍थून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून चार तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २० जणांसह एकूण ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे गुरुवारी (ता. ३) २९ अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यात सात महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, प्रोफेसर कॉलनी, बंजारा नगर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, उर्वरित शिवर, महसूल कॉलनी, रतनलाल प्लॉट, राधाकिसन प्लॉट, रजपूतपुरा, कृषी नगर, सांगळुद, पारस, रणपिसे नगर, बाळापूर, यवतमाळ अर्बन बँक अकोला, गुलजार पुरा, पाटील मार्केट, बाळापूर नाका, आंबेडकर नगर, रामदास पेठ आणि बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


कोरोना रुग्णांची स्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९५३०
- मृत - २९६
- डिस्चार्ज ८६६२
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५७२

(संपादन - विवेक मेतकर)

loading image